दिल्लीहून मुंबई जाण्यास अजून किती वेळ लागणार; कधी पूर्ण होणार एक्सप्रेस वेचे काम? गडकरींनी संसदेत दिलं उत्तर

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे कधी पूर्ण होणार या प्रश्नाचे लेखी उत्तर दिले. उत्तर देताना गडकरी म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, प्रकल्पाची एकूण लांबीपैकी 350 किमीचं निर्मिती आधीच केली गेली आहे आणि आता 825 किमीच्या रस्त्याचा बनवण्याचं काम केले जात आहे. तर बाकी असलेल्या 163 किलोमीटरसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. चालू वित्त वर्षात बाकी असलेली कामे दिली जाणार आहेत. कोरोनामुळे काही अडचणी आल्या होत्या असंही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितलं.



सध्या देशातील 2507 किलो मीटर लांबीच्या 7 एक्सप्रेस-वे च्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

440 किलोमीटरचं काम पूर्ण करण्यात आलं


2507 किलोमीटरपैकी 440 किलोमीटरचं काम पूर्ण करण्यात आले आहे. कोविड (साथीच्या रोगाचा) साथीच्या आजारामुळे मदत मिळावी यासाठी मंत्रालयाने 3 जून 2020 रोजी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गडकरी पुढे म्हणाले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर मार्ग तयार करण्यासाठी प्लास्टिकचा अनिवार्य उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याचबरोबर 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागाच्या 50 किमी क्षेत्रामध्ये सर्विस बनवण्यासाठी मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत.


देशात 701 टोल प्लाझा


वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की सध्या राष्ट्रीय महामार्गावरील 701 टोल प्लाझा आणि राज्य महामार्गावरील 149 फी प्लाझा इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (ईटीसी) पायाभूत सुविधांसह सक्षम आहेत. ते म्हणाले की, 11 जुलै 2021 पर्यंत फास्ट टॅगच्या माध्यमातून एकूण 52,386.58 कोटी रुपये जमा झाले आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

भारत में मेडिकल कोडर कैसे बनें

फार्मा में क्वालिटी एश्योरेंस में करियर का मौका

भारत में शीर्ष 10 एंटासिड ब्रांड